Soyabean Tokan Yantra Anudan – शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सोयाबीन हे एक प्रमुख पीक म्हणून मानले जाते सोयाबीन हे तेल बी आयुक्त पीक असून अतिशय कमी खर्चा मध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे आपल्या देशात सुमारे पन्नास टक्के पेक्षा जास्ती लोक हे शेती करतात आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन हे शेती आहे.
त्यासोबत आजकाल शेतीच्या कामांसाठी मजूर वर्ग मिळणे ही एक मोठी अडचण आहे. आणि पारंपरिक पद्धतीने शेती करायचं म्हटलं तर बैलजोडी हवीच परंतु 4 यांचे दर वाढल्याने बैलजोडी घेणेसुद्धा बहुतांशी शेतकऱ्यांना परवडत नाही तर यावर उपाय म्हणजे पेरणीसाठी सोयाबीन टोकन यंत्र Soyabean Tokan Yantra Anudan वापरणे. तर या यंत्रामध्ये आपण दाणेदार खते आणि सोयाबीनचे बियाणे टाकून एकाच वेळी पेरणी करू शकतो.
शेतकरी मित्रांनो या यंत्राच्या मदतीने तुम्ही सोयाबीनची टोकण पद्धतीने पेरणी करू शकता आणि या यंत्रामध्ये दोन ओळीतील अंतर हे पिकाच्या गरजेनुसार 22.5 30 45 60 सेंटिमीटर इतके ठेवता येते. या सोयाबीन टोकण यंत्राद्वारे आपण एका दिवसांमध्ये एक ते दीड एकर क्षेत्रावर टोकण करून वेळेची आणि पैशाची दोन्ही प्रकारे बचत करू शकतो आणि काम सुद्धा अगदी अचूकपणे करू शकतो.
आणि अशाच प्रकारे शेतकऱ्यांचे काम अगदी सोपं करण्यासाठी सरकारकडून सोयाबीन टोकण यंत्र साठी अनुदान दिले जाणार आहे तर या बद्दल आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात.
राज्य शासनातर्फे सोयाबीन टोकण यंत्र करिता 50 टक्के इतके अनुदान दिले जाणार आहे अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या सहाय्याने जास्त पैशामुळे शेती करणं हे परवडत नाही. तर या शेतकऱ्यांना सुमारे 50 टक्के अनुदानावर सोयाबीन टोकण यंत्र राज्य सरकार मार्फत पुरविण्यात येणार आहे.
शेतकरी मित्रांनो सोयाबीन टोकण यंत्र ची किंमत ही मार्केटनुसार सात ते नऊ हजार रुपयांपर्यंत असते तर यामध्ये सुमारे पन्नास टक्के अनुदान म्हणजेच साडेतीन ते साडेचार हजार रुपयांपर्यंत सरकार मार्फत अनुदान मिळणार आहे. आणि जर तुम्हाला 50% अनुदान हवे असेल तर तुम्हाला दहा हजार रुपयांपर्यंतचे टोकन यंत्र हे घ्यावा लागणार आहे.
आता आपण जाणून घेऊया योजनेची पात्रता काय आहे
- सर्वप्रथम अर्जदार हा त्या जिल्ह्याचा रहिवासी असावा
- तसेच अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील अर्जदार असणे आवश्यक आहे
- अर्जदाराने अर्ज करताना या योजनेच्या सर्व अटी व शर्ती पूर्ण करणे आवश्यक आहे
सोयाबीन टोकण यंत्र साठी आवश्यक असलेली कागदपत्रे कोणती
- आधार कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
- जात प्रमाणपत्र झेरॉक्स
- सात-बारा आणि आठ अ उतारा
- आणि जर अर्जदार अपंग असेल तर अपंगत्व प्रमाणपत्र
सोयाबीन कापणी यंत्र साठी अर्ज कुठे आणि कसा करावा
शेतकरी मित्रांनो सोयाबीन टोकण यंत्र (Soyabean Tokan Yantra Anudan) साठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला वरील सर्व कागदपत्रांची झेरॉक्स काढून घ्यावी लागेल आणि यानंतर तुमच्या नजीकच्या जिल्हा परिषद पंचायत समिती कार्यालयात जाऊन सोयाबीन टोकण यंत्राचा अर्ज द्यायचा आहे तिथे गेल्यानंतर अर्जात विचारलेली माहिती अगदी अचूकपणे भरून कागदपत्र तुम्हाला संबंधित कार्यालयात सबमिट करायचे आहेत
त्याचप्रमाणे तुम्ही सोयाबीन टोकण यंत्र करिता ऑनलाईन देखील अर्ज करू शकता आणि याकरिता तुम्हाला महाडीबीटी महा गव्हर्मेंट पोर्टल जे आहे तर त्या ठिकाणी अर्ज करता येईल
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या बटनवर टच करा
