कृषी ग्रुप जॉईन करा

Kadba Kutti Machine Anudan | कडबा कुट्टी मशीन घेण्यासाठी सरकारकडून 75 टक्के अनुदान मिळणार ऑनलाईन अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Kadba Kutti Machine Anudan: कडबा कुट्टी मशीन योजना कडबा कुट्टी मशीन घेण्यासाठी सरकारकडून 75 टक्के अनुदान मिळणार ऑनलाईन अर्ज करा. महाराष्ट्र सरकार दरवर्षीं कडबा कुट्टी योजना राबवत असते. यातून शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान देऊन कडबा कुट्टी मशीन पुरवण्यात येते.

महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याकडे गायी म्हशी पाहायला मिळतात. अनेकजण पशुपालन व्यवसाय, दूध व्यवसाय करतात. अशावेळी जनावरांना चारा महत्वाचा असतो. जनावरांना चारा देण्यासाठी शेतकऱ्यांचा बराच वेळ खर्ची होत असतो. चाऱ्याचे तुकडे करा, चारा बारीक करा यामुळे इतर कामांना वेळ मिळत नाही. यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कडबा कुट्टी योजना अंमलात आणण्यात आली आहे. काय आहे ही योजना पाहुयात…

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

महाराष्ट्र सरकार दरवर्षीं कडबा कुट्टी योजना राबवत असते. अनेक शेतकऱ्यांकडून अर्ज मागवला जातो. यातून शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान देऊन कडबा कुट्टी मशीन पुरवण्यात येते. या कडबा कुट्टीचे अनेक फायदे असून विद्युत मोटर्सही जोडली असल्याने चारा कापण्यासाठी खूप कमी वेळ लागतो.

New Pikvima update 75% पिकविमा वाटप सुरु, तुमचा जिल्हा आहे का? चेक करा.

जास्तीचा चारा अगदी कमी वेळेत कापता येतो. चारा बारीक केल्यानंतर जनावरांना खाण्यास सोपा जातो. शिवाय लवकर पचन होण्यास मदत होते. तसेच बारीक केलेल्या चाऱ्यास जागाही कमी लागते. शिवाय चाऱ्याची नासाडी कमी होते. 

कोण करू शकत अर्ज?

महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे अर्जदाराचे आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक असणे गरजेचे आहे. अर्जदाराचे वय 18 वर्षे पुढे पाहिजे. 

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • बँक डिटेल्स
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • उत्पन्नाचा दाखला
  • कडबा कुट्टी मशीन खरेदी केल्याचे बिल
  • जनावरांचा विमा केल्याचे प्रमाणपत्र

किती अनुदान मिळतं?

कडबा कुट्टी योजनेसाठी 50 ते 75 टक्के अनुदान देते. जर समजा तुम्ही कडबा कुट्टी मशीन 20 हजार रुपयांना खरेदी केली. तर त्यावर योजेनच्या माध्यमातून 10 हजार इतकी रक्कम देण्यात येते. 

आता पाहुयात अर्ज कसा करायचा

  • महाराष्ट्र शासनाकडून अनेक योजना राबविण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या  https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer  या पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागतो.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

  • कडबा कुट्टी योजेनसाठी देखील याच पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागेल.
  • या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुमचा युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
  • जर तुम्ही याआधी नोंदणी केली नसेल तर नवीन अर्जदार नोंदणी बटनावरती क्लिक करा.
  • त्यानंतर नोंदणी करावयाची आहे. यानंतर पुन्हा होमपेजवर येऊन पुढील प्रक्रिया करावयाची आहे. 

.

  • लॉग इन करून अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर एक पुन्हा नवीन पेज लोड होईल, त्यामध्ये ‘कृषी यंत्रणा पुढील बाबी निवडा’, या बटनावर क्लिक करा.
  • त्यानंतर पुढे एक अर्ज उघडेल, त्यामध्ये पहिला पर्यायामध्ये आपल्याला (कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य) हा पर्याय निवडा.

.

  • त्यानंतर पुढच्या पर्यायांमध्ये (मनुष्य चलित अवजारे) हा पर्याय निवडायचा आहे.
  • त्यानंतर पुढील स्लाईडमध्ये कटर श्रेडरची निवड करा. हा पर्याय निवडल्यानंतर स्क्रिनवर मशीनचे प्रकार दिसतील. आपल्याला आवश्यक असलेल्या साईजनुसार मशीनचा पर्यायाची निवड करा.
  • त्यानंतर खाली एक सूचना असेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर जतन करा. यानंतर या अर्जासाठी 23 रुपये 60 पैशाचे ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर अर्ज सबमिट होईल.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

वरील काही गोष्टी तुमच्याकडे असणे हे गरजेचे आहे अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या पंचायत समितीमध्ये किंवा ग्रामपंचायत मध्ये जाऊन या संबंधित अधिक माहिती घेऊ शकता.

कडबा कुट्टी योजना फायदे

शेतकरी मित्रांनो या योजनेचे जर आपण फायदे पाहिले तर आपल्याला असंख्य प्रकारचे फायदे हे होणार आहेत ज्यामुळे आपल्या उत्पादनात वाढ देखील होणार आहे. जसे की आपण पाहतो की जनावरे आपण टाकलेला चारा संपूर्ण खात नाहीत त्यामुळे त्याचे नुकसान आपल्याला चाऱ्यामध्ये होते व उत्पादनात देखील होते.

MSRTC Bus Tikit Rates 2024 : आजपासून एसटी बसचे नवीन दर जाहीर, नवीन दर काय असतील येथे पहा नवीन दर.

ते टाळण्यासाठी आपण जर कडबा कुट्टी यंत्रणेचा वापर केला तर तो चारा जनावरे संपूर्ण खातात. व त्या चाऱ्या च्या अन्नद्रव्यांचा उपयोग पुरेपूर जनावरांना मिळतो. आणि आणि या यंत्रणेमुळे आपल्याला अगदी कमी वेळेत जास्त चारा हा बारीक करून मिळतो. असे असंख्य फायदे आपल्याला या कडबा कुट्टी यंत्रणेतून मिळतात त्यामुळे आपण या योजनेचा लाभ नक्कीच घेतला पाहिजे.

कडबा कुट्टी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला जर कडबा कुट्टी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खालील कागदपत्रे तुम्हाला या योजनेचा अर्ज करताना लागणार आहेत जमिनीचा सातबारा, आठ क आधार कार्ड, बँक खाते, विज बिल अशी आवश्यक कागदपत्रे तुम्हाला या योजनेसाठी लागणार आहे.

कडबा कुट्टी योजनेमध्ये सरकार किती अनुदान देते

शेतकरी मित्रांनो कडबा कुट्टी योजनेसाठी सरकार आपल्याला 50 ते 75 टक्के सबसिडी देते म्हणजेच अनुदान देते म्हणजेच जर आपण कडबा व कुट्टी मशीन 20 हजार विकत घेतली तर त्यावर सरकार आपल्याला 10  हजार इतके जास्तीत जास्त रक्कम या योजने मार्फत देते.

कडबा कुट्टी मशीन किंमत किती आहे

कडबा कुट्टी मशीन किंमत 15 हजार रुपयांपासून ते 20 हजार रुपयांपर्यंत कमीत कमी आपल्याला चांगली मशीन मिळून जाते

Web Title: Read A to Z information about Kadaba Kutti Machine Scheme in one click

Styled Responsive Table
प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्वाचे लेख
Arrow Icon₹२००० चा पुढील हफ्ता या दिवशी येणार Arrow Iconपीएम किसान न्यूज
Arrow Iconनोंदणी क्रमांक शोधा Arrow Iconई-केवायसी करा
Arrow Iconऑनलाइन दुरुस्ती करा Arrow Iconनवीन शेतकऱ्यांची नोंदणी करा
Arrow Iconलाभार्थ्यांची यादी पहा Arrow Iconहेल्पलाइन क्रमांक
Arrow Iconआधारवरून पीएम किसान स्टेटस तपासा Arrow Iconआधार वरून नाव दुरुस्ती करा
Arrow Iconपैसे परत करा Arrow Iconअपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
Arrow Iconपीएम किसान पात्रता जाणून घ्या Arrow Iconऐच्छिक आत्मसमर्पण
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj