कृषी ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्रात 22 नवीन जिल्हे आणि 49 तालुक्यांची निर्मिती होणार ; नवीन जिल्ह्यांची यादी पहा..! 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maharashtra New Districts List  

 Maharashtra New Districts List : महाराष्ट्र सरकारने राज्यात २२ नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यात एकूण जिल्ह्यांची संख्या ३६ वरून ५८ होईल. यामध्ये नाशिक, पालघर, अहमदनगर, ठाणे, पुणे, रायगड, सातारा, रत्नागिरी, बीड, लातूर, नांदेड, जळगाव, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांची विभागणी करून नवीन जिल्हे तयार करण्यात येणार आहेत. या निर्णयाचे स्वागत राज्यातील अनेक नेत्यांनी केले आहे. त्यांनी या निर्णयामुळे राज्यातील प्रशासकीय कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल आणि नागरिकांना प्रशासनापर्यंत पोहोचण्यास सोपे होईल असे म्हटले आहे.

महाराष्ट्र मधील नवीन जिल्ह्यांची निर्मिती

या नवीन जिल्ह्यांची निर्मिती केल्याने राज्यातील प्रशासकीय यंत्रणा अधिक कार्यक्षम होईल. तसेच, जिल्हा मुख्यालयापासून दूर असलेल्या भागातील नागरिकांना शासकीय सुविधांपर्यंत पोहोचणे सोपे होईल. लोकसंख्या आणि भौगोलिक क्षेत्र व जिल्हा मुख्यालयापासून लांब असणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेवून जिल्ह्याचे विभाजन व्हावे, अशी मागणी सातत्याने होत असते.

यापूर्वीचा इतिहास पाहिल्यास १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. राज्याची स्थापना झाली त्यावेळी २६ जिल्हे होते, मात्र त्यानंतर लोकसंख्या वाढली तसेच क्षेत्रफळाच्या दृष्टीनेही अनेक जिल्हे मोठे असल्याने प्रशासकीय कामानिमित्त सर्वसामान्य नागरिकांना मुख्यालयी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे अवघड झाले होते, त्यामुळे टप्प्या टप्प्याने १० नवीन जिल्हे निर्माण करण्यात आले होते.

जुने 36 जिल्हे आणि 358 तालुके

तसेच तेव्हापासून ते आज महाराष्ट्रात 36 जिल्हे आणि 358 तालुके अशाप्रकारे आपल्याला पाहायला मिळतात. परंतु यामध्ये आता बदल होणार आहे अशा प्रकारचा निर्णय घेतला असून ठराव पास करण्यात आलेला आहे. ( Maharashtra New Districts List Announced )

आज जर वास्तविक आपण पाहिले तर कोणत्याही जिल्ह्यांमध्ये एका शेवटच्या गावातील नागरिकाला जर आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यालयाला काही कामानिमित्त भेट द्यायची असेल तर, संपूर्ण दिवस खर्च करावा लागतो यामुळे नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. या बँकांवर बंदी घालण्यात आली

नवीन जिल्ह्यांची यादी पुढीलप्रमाणे

आजचे प्रस्तावित 22 जिल्हे –

  • नाशिक जिल्ह्यातून नवीन 1)मालेगाव आणि 2) कळवण जिल्हे तयार करण्याचे प्रस्तावित आहेत.
  • अहमदनगरचे विभाजन करून नवीन संगमनेर,शिर्डी आणि श्रीरामपूर असे नवीन तीन जिल्हे निर्माण होणार आहेत.
  • ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन 1) मीरा-भाईंदर आणि 2) कल्याण जिल्हे निर्माण होणार आहेत.
  • पुणे जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन 1) शिवनेरी नवीन जिल्हा

  • रायगड जिल्ह्याचे विभाजन करून नवीन महाड जिल्हा तयार होणार आहे.
  • सातारा जिल्ह्यातून नवीन माणदेश हा जिल्हा तयार होणार आहे.
  • रत्नागिरी मधून नवीन मानगड जिल्हा तयार होणार आहे.
  • बीड जिल्ह्यामधून आंबेजोगाई हा जिल्हा नवीन तयार होणार आहे.

  • लातूर जिल्ह्यातून नवीन 1) उदगीर जिल्हा निर्माण होणार आहे.
  • नांदेड या जिल्ह्यातून नवीन 1) किनवट हा जिल्हा तयार होणार आहे.
  • जळगाव जिल्ह्यातून नवीन 1) भुसावळ हा जिल्हा तयार होणार आहे.
  • बुलढाणा या जिल्ह्यातील नवीन 1) खामगाव हा जिल्हा तयार होणार आहे.

  • अमरावती या जिल्ह्यातून नवीन 1) अचलपूर हा नवीन जिल्हा तयार होणार आहे.
  • यवतमाळ या जिल्ह्याचे विभाजन करून नवीन 1) पुसद हा जिल्हा तयार केला जाणार आहे.
  • भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून नवीन 1) साकोली हा जिल्हा होईल.
  • चंद्रपूर या जिल्ह्याचे विभाजन करून नवीन 1) चिमूर हा जिल्हा तयार होईल.
  • गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून नवीन 1) अहेरी हा जिल्हा तयार होणार आहे. ( Maharashtra New Districts List Announced )

Styled Responsive Table
प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्वाचे लेख
Arrow Icon₹२००० चा पुढील हफ्ता या दिवशी येणार Arrow Iconपीएम किसान न्यूज
Arrow Iconनोंदणी क्रमांक शोधा Arrow Iconई-केवायसी करा
Arrow Iconऑनलाइन दुरुस्ती करा Arrow Iconनवीन शेतकऱ्यांची नोंदणी करा
Arrow Iconलाभार्थ्यांची यादी पहा Arrow Iconहेल्पलाइन क्रमांक
Arrow Iconआधारवरून पीएम किसान स्टेटस तपासा Arrow Iconआधार वरून नाव दुरुस्ती करा
Arrow Iconपैसे परत करा Arrow Iconअपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
Arrow Iconपीएम किसान पात्रता जाणून घ्या Arrow Iconऐच्छिक आत्मसमर्पण
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj